Posts

Showing posts from January, 2021

सौंदर्य

 *सौंदर्याची कमतरता चांगला* *स्वभाव नक्की पुर्ण करतो ;* *पण स्वभावाच्या कमतरतेला* *सौंदर्य कधीच पुर्ण करु शकत नाही,* *म्हणुन स्वभाव परिपुर्ण असावा सौंदर्य नव्हे.*

तुझ्यासोबत...

 येणारा प्रत्येक क्षण बेधुंद होऊन जगण्याची आस तुझ्यासोबत.. पावसाच्या सरी चे ओलाचिंब शहारे तुझ्यासोबत.. ओल्या मातीचा सुगंध दरवळतो तसा तुझ्या मादक गंधाने न्हाहून भरलेल्या भावना तुझ्यासोबत.. विसावलेले रस्ते पुढे सरकत सरकत तुझ्यासोबत.. आणि आयुष्याच्या संपुष्टात येणाऱ्या शेवटचा टप्पा ही तुझ्यासोबत..!!

*🙏विचारधन*🙏 *"ठेच-लागलीच पाहिजे माणूस कणखर होतो "*

*मित्रांनो ! आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या !! कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं!*  परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा काही ठिकाणी तर त्याला गहाण टाकण्याची वेळ यावी, कधी तरी कुणाच्या पाया पडायला लागावं, गरज नसताना सुद्धा कुणाची तरी हजारवेळा माफी मागायला लागावी, कित्येक रात्री ह्या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा, रडून रडून डोळे सुजावेत इतका अफाट त्रास व्हावा ! अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं.!! अन् मग बघावं ह्या वेदनांतून तावून सुलाखून निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन.!!* "ज्याला कुणाच्या असण्या-नसण्याचा काही फरकच पडत नाही. तो जगतो फक्त "आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय" या एकाच तत्वावर. "!!*...

तुझी अदा....

 सांज वेळची लाली तुझ्या गाली उतरली  गुलाबांनी ओठावरची गुलाबी चोरली  तुझ्या रुसण्या मध्ये सुद्धा एक  अदा आहे  ह्याच सर्व गोष्ठीवर मी फिदा आहे..

आठवण...

 माझ्या जखमा ओल्या करून,  पावसाने काय सिद्ध केले ?...  क्षणभर त्याने माझ्या मनातुन वाहून,  पुन्हा तुझ्याच आठवणीत रमवले...

माझा पगार नाही तर माझी कमाई माझा अभिमान आहे.....*

 *माझं कमवणं माझा अभिमान आहे*👍😊   काल एक मैत्रीण सांगत होती, माझ्या मिस्टरांना आवडत नाही बायकांनी नोकरी/बिझनेस करणे, आणि एवढी मेहनत कशाला करायची?  नवरा चांगले कमावतो, प्रॉपर्टी खूप आहे, मला गरज नाही जॉबची.    दुसरी एक म्हणते , आता जॉब म्हणजे फक्त घर manage करणे. कशाला नसती उठाठेव. मला कीव येत होती त्यांच्या विचारांची. कमवणं म्हणजे फक्त एक आर्थिक गरज आहे का?  नक्कीच नाही.  *माझं कमवणं माझी ओळख आहे....*  *पत्नी , सून या पलीकडची....*   *माझं कमवणं परतफेड आहे.....*   *माझ्या आई वडीलानी मला शिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची.....*   *माझं कमवणं माझ्या घरच्यांचे स्वप्न आहे.....*  *ज्यांनी मला घर सांभाळून बाहेर पडता येते हे शिकवले.....*   *माझं कमवणं माझ्या नवऱ्यासाठी अभिमान आहे.....*  *चार चौघात तो बायकोची थट्टा करू शकत नाही.....*   *माझी कमाई माझ्या बहिणीसाठी एक प्रेरणा आहे....*  *माझी कमाई माझ्या वैचारिक पातळीचा पाया आहे....* *माझी कमाई माझ्या अस्तित्वाचा भाग आहे....*  *माझा पगार नाही तर माझी कमाई मा...

*केलेलं चांगलं काम परतून नक्कीच येत*

  एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होतेतेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद झाला लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले, अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे निश्चित होते. त्या माणसाला काही सुचेनासं झालं. पण तासा भरात एक चमत्कार झाला आणि कोणी तरी दरवाजा उघडला, तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवलाप्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले, की तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय. सुरक्षा रक्षक म्हणाला, या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की,  जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो. त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे एक दिवस त्...

ठेच-लागलीच पाहिजे माणूस कणखर होतो "*

 *🙏विचारधन*🙏 *"ठेच-लागलीच पाहिजे माणूस कणखर होतो "*  *मित्रांनो ! आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या !! कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं!*  परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा काही ठिकाणी तर त्याला गहाण टाकण्याची वेळ यावी, कधी तरी कुणाच्या पाया पडायला लागावं, गरज नसताना सुद्धा कुणाची तरी हजारवेळा माफी मागायला लागावी, कित्येक रात्री ह्या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा, रडून रडून डोळे सुजावेत इतका अफाट त्रास व्हावा ! अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं.!! अन् मग बघावं ह्या वेदनांतून तावून सुलाखून निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन.!!* "ज्याला कुणाच्या असण्या-नसण्याचा काही फरकच पडत नाही. तो जगतो फक्त "आलात तर ...

हिमा दास..

 भारत की मशहूर धाविका हिमा दास ने जब पहली बार राष्ट्रीय प्रतियोगिता में हिस्सा लिया था , तब उनके पिता ने स्पाइक्स वाले जूते लाकर दिए थे । यह सामान्य जूते थे , जिस पर उन्होंने खुद से एडिडास ( Adidas ) लिख दिया था । आज एडिडास कंपनी खुद उनके लिए जूते बनाती है और उसपर हिमा दास नाम छपता है 

अनुभवाची शिदोरी....

 अनुभवाची शिदोरी... आज मित्रासोबत मॉलमध्ये गेलो होतो, तसे तर माझ्या गावात जास्त मोठ मोठे मॉल आणि जे शहरात असतात तसे गेमझोन, तस काही नाही आहे ... पण दोन तीन छोटे मोठे मॉल आहे.. मी आणि माझा मित्र आठवड्यातून एखाद्या वेळेस सोबत असच फिरायला जातो. आम्ही दोघ कधी कधी अशीच आयुष्याची मज्जा घेतो, आणि कधी कधी आयुष्य आमची..तसाच काही आजचा दिवस ठरला. आज मॉल मध्ये गेले असताना आम्ही दोघांनी काही वस्तू घेतल्या ... आणि ते घेऊन बाहेर निघालो.. बाहेर येत असताना मला काही मुलामुलीचे जोर जोरात हसण्याचा आवाज आला, आवाजाची दिशा बघता आवाज मॉल खालील बेसमेंट मधून येत होता.. मित्राला म्हटलं तू थांब, मी आलोच..खाली उतरलो आणि समोर बघतो तर काय काही तीनचार मुलमुली समोर होती,,केस विसकटलेले, त्याच्या अंगावरचे कपडे फाटलेले, आणि हातामध्ये एक एक मोठी पिशवी...(तुम्ही समजले असलाचं कोण? ) ते जोर जोरात हसत होते.. थोडा वेळ त्याच्या कडे बघल्यावर समजल... त्याच्या जवळ एक मोबाईल चे कव्हर होते आणि बारी बारी ते घेऊन आपण मुल मुली जशा प्रकारे मोबाईल बोलतो तसेच ते बोलत होते, मुलींसारखे नखेरे, मुली कशा प्रकारे कपडे सांभाळून चालतात, हु...

आज ही....

  *आज ही बरसतो तुझ्या आठवणींचा पाऊस*  *माझ्या मनातल्या अंगनात*  *कितीक अश्रु ढाळु अजून*  *सख्या तुझ्या विरहात* *तुझ्याविना अर्थ नाही आता जगण्यात*  *शेवटच्या श्वासापर्यंत तुच हवास माझ्या जिवनात* *आज ही तुझ्या गाण्यांचा स्वर*  *घुमतो माझ्या कानांत* *आज ही, फ़क्त आणि फ़क्त*  *तुच आहेस तुझ्या या मृगनयनी च्या मनात* *आज ही खुप अडथळे आहेत*  *तुझ्या माझ्या मिलनात* *तरी तुझेच नाव घेत असते* *सख्या,प्रत्येक माझ्या हद्याच्या स्पंदनात*  *आज ही तुझ्या परतीची वाट पाहतेय* *तुझ्या जाताना च्या पाऊलखुणा*  *आज ही मी तासनतास न्याहाळते*

अडाणी आईवडील..

मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला ... अग... छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत... शालांत परिक्षेत..!  आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली, ".. बघुया मला दाखवा...!  इतक्यात,.. मुलगा पटकन बोलला ...  "बाबा तिला कुठे Result दाखवताय ?... तिला काय लिहता वाचता येते का.? अशिक्षित आहे ती...!"  भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली. ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली...! मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले... "हो रे ! ते पण खरच आहे...!  आमच लग्न झाल तेव्हा तीन महिन्यातच तुझी आई गर्भवती राहिली.. मी विचार केला लग्नानंतर कुठे फिरलो नाही.. व्यवस्थितपणे एकमेकांना समजल पण नाही,. तर ह्यावेळी गर्भपात करुन पुढे chance घेउया.. पण तुझी आई ठामपणे *"नाही"* म्हणाली.. नको ते नंतर वगैरे... फिरण, समजण पण नको... आणि तुझा जन्म झाला... *अशिक्षित होती ना...* तु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सुधृड व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती...  *अशिक्षित होती ना...* ...

"गंभीर बनू नका"

  फार गंभीर बनून जगू नका. हे विश्व करोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही. या जगात आपले काहीच नसते, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करु नका. मी अमूक, मी तमूक असा अंहकार बाळगू नका. सर्वांशी प्रेमाणे रहा. धर्म, जात, तत्व, या गोष्टी माणसाने निर्माण केल्या त्यामध्ये अडकून पडू नका. स्वतःचा भरवसा नसतांना इतरांना संपवण्याची भाषा बोलू नका. इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब करु नका. त्यांचे जीवन ते जगले तुम्ही तुमचे जीवन जगा व इतरांना जगू द्या. आता काळ बदलला आहे. आपली खरी गरज काय आहे ओळखा उगीच फालतु गोष्टीत नाक खुपसू नका. हजारों प्रकारचे संकट घोंघावत असतांना शुल्लक गोष्टींने विचलित होऊ नका.जीवन गंमतीने जगा. जरा मोकळेपणाने हसा. इतरांनाही आनंदी करा. लक्षात ठेवा तुमच्या गंभीरपणाने कुणाचेही भले होणार नाही. साऱ्या जगाचा विचार करू नका. नसती चिंता करु नका. लहान सहान गोष्टींचा आनंद घ्या. सतत गंभीर बनू नका. इतरांशी मोकळेपणाने बोला. त्यामध्ये कमीपणा मानू नका. तुम्ही स्वतःला काहीही समजले तरी निसर्...

थोडे आयुष्य असे पण जगावे...

 नक्कीच माणसानं नेहमी लोकांनच्या आयुष्यात मिठासारखचं असावं,आपला कमी पणा नेहमी त्यांच्या आयुष्यात भासला पाहिजे, पण ज्यांनी आपला वापर त्यांच्या आयुष्यात योग्य केला, त्याचं आयुष्य मात्र आपण देखील रुचकर बनवायला पाहिजे .... ✍️

हे क्षण निघून जातील...

एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू , संत , फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल व मला कायम आनंदी ठेवेल.          अखेर एका बौद्ध भिक्षुने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.           बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच दुष्ट व  कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.         विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला. हे समजल्यावर प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार.  त्...

तुझी आठवण....

 आज ही....  आज ही....  *आज ही बरसतो तुझ्या आठवणींचा पाऊस*  *माझ्या मनातल्या अंगनात*  *कितीक अश्रु ढाळु अजून*  *सख्या तुझ्या विरहात* *तुझ्याविना अर्थ नाही आता जगण्यात*  *शेवटच्या श्वासापर्यंत तुच हवास माझ्या जिवनात* *आज ही तुझ्या गाण्यांचा स्वर*  *घुमतो माझ्या कानांत* *आज ही, फ़क्त आणि फ़क्त*  *तुच आहेस तुझ्या या मृगनयनी च्या मनात* *आज ही खुप अडथळे आहेत*  *तुझ्या माझ्या मिलनात* *तरी तुझेच नाव घेत असते* *सख्या,प्रत्येक माझ्या हद्याच्या स्पंदनात*  *आज ही तुझ्या परतीची वाट पाहतेय* *तुझ्या जाताना च्या पाऊलखुणा*  *आज ही मी तासनतास न्याहाळते*