माझा पगार नाही तर माझी कमाई माझा अभिमान आहे.....*

 *माझं कमवणं माझा अभिमान आहे*👍😊


  काल एक मैत्रीण सांगत होती, माझ्या मिस्टरांना आवडत नाही बायकांनी नोकरी/बिझनेस करणे, आणि एवढी मेहनत कशाला करायची? 

नवरा चांगले कमावतो, प्रॉपर्टी खूप आहे, मला गरज नाही जॉबची.

   दुसरी एक म्हणते , आता जॉब म्हणजे फक्त घर manage करणे. कशाला नसती उठाठेव. मला कीव येत होती त्यांच्या विचारांची. कमवणं म्हणजे फक्त एक आर्थिक गरज आहे का? 

नक्कीच नाही. 


*माझं कमवणं माझी ओळख आहे....* 


*पत्नी , सून या पलीकडची....*

 

*माझं कमवणं परतफेड आहे.....*  


*माझ्या आई वडीलानी मला शिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची.....*

 

*माझं कमवणं माझ्या घरच्यांचे स्वप्न आहे.....* 


*ज्यांनी मला घर सांभाळून बाहेर पडता येते हे शिकवले.....*

 

*माझं कमवणं माझ्या नवऱ्यासाठी अभिमान आहे.....*


 *चार चौघात तो बायकोची थट्टा करू शकत नाही.....*

 

*माझी कमाई माझ्या बहिणीसाठी एक प्रेरणा आहे....* 


*माझी कमाई माझ्या वैचारिक पातळीचा पाया आहे....*


*माझी कमाई माझ्या अस्तित्वाचा भाग आहे....* 


*माझा पगार नाही तर माझी कमाई माझा अभिमान आहे.....*


*कमवणे* म्हणजे गरीब असणे......

*कमवणे* म्हणजे उठाठेव.....


 हे असे विचारच आपल्याला मागे खेचतात. त्यामुळे हे विचार सोडून द्या. जगाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतः साठी काही तरी करा. विचारांचे standard सुधारले की व्यक्ती आपोआप स्टॅंडर्ड होते.


🙏🙏 *कौंटुंबीक जबाबदारी सांभाळुन यशस्वीपणे कमवणाऱ्या सर्व स्त्रियांना समर्पित* 🙏🙏

Comments