तुझ्यासोबत...
येणारा प्रत्येक क्षण बेधुंद होऊन जगण्याची आस तुझ्यासोबत..
पावसाच्या सरी चे ओलाचिंब शहारे तुझ्यासोबत..
ओल्या मातीचा सुगंध दरवळतो तसा तुझ्या मादक गंधाने न्हाहून भरलेल्या भावना तुझ्यासोबत..
विसावलेले रस्ते पुढे सरकत सरकत तुझ्यासोबत..
आणि आयुष्याच्या संपुष्टात येणाऱ्या शेवटचा टप्पा ही तुझ्यासोबत..!!
Melodious Poem
ReplyDelete