अनुभवाची शिदोरी....

 अनुभवाची शिदोरी...


आज मित्रासोबत मॉलमध्ये गेलो होतो, तसे तर माझ्या गावात जास्त मोठ मोठे मॉल आणि जे शहरात असतात तसे गेमझोन, तस काही नाही आहे ... पण दोन तीन छोटे मोठे मॉल आहे.. मी आणि माझा मित्र आठवड्यातून एखाद्या वेळेस सोबत असच फिरायला जातो. आम्ही दोघ कधी कधी अशीच आयुष्याची मज्जा घेतो, आणि कधी कधी आयुष्य आमची..तसाच काही आजचा दिवस ठरला.

आज मॉल मध्ये गेले असताना आम्ही दोघांनी काही वस्तू घेतल्या ... आणि ते घेऊन बाहेर निघालो.. बाहेर येत असताना मला काही मुलामुलीचे जोर जोरात हसण्याचा आवाज आला, आवाजाची दिशा बघता आवाज मॉल खालील बेसमेंट मधून येत होता.. मित्राला म्हटलं तू थांब, मी आलोच..खाली उतरलो आणि समोर बघतो तर काय काही तीनचार मुलमुली समोर होती,,केस विसकटलेले, त्याच्या अंगावरचे कपडे फाटलेले, आणि हातामध्ये एक एक मोठी पिशवी...(तुम्ही समजले असलाचं कोण? )

ते जोर जोरात हसत होते.. थोडा वेळ त्याच्या कडे बघल्यावर समजल... त्याच्या जवळ एक मोबाईल चे कव्हर होते आणि बारी बारी ते घेऊन आपण मुल मुली जशा प्रकारे मोबाईल बोलतो तसेच ते बोलत होते, मुलींसारखे नखेरे, मुली कशा प्रकारे कपडे सांभाळून चालतात, हुबेहूब तशी नक्कल करत होते आणि बाकी त्यांना बघून जोरात हसायचे...तेव्हा त्यांना बघून मला हे समजल कि समाजात नेहमी आपल्याला कोणी न कोणी बघत असत,म्हणून आपलं वागण योग्य असलं पाहिजे... काही वेळेपर्यंत त्याचा हा कार्यक्रम मी पूर्ण आनंद घेऊन पहिला,, थोड्या वेळाने त्याच्या जवळ गेलो, मला बघताच थोडे घाबरे.. पण मी काही न बोलता माझ्या हातातील बिस्कीट चे आणि मिठीचे काही box त्यांना दिले , पहिले तर नाहीच म्हटले, पण मी एका लहान मुलाच्या हातात दिले तर त्याने घेऊन घेतले आणि मग बाकीच्यांनी पण घेतले...आणि मग मी तिथून निघता झालो. वर चढलो आणि हळूच खाली डोकावून पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावरील तो आनंद मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही...त्याचे ते निरागस चेहरे अजून हि माझा डोळ्यासमोर आहे. खरच आजचा दिवस आयुष्यभर माझ्या आठवणीत राहील..मी नेहमी एकांतात आणि पुस्तकांमध्ये माझा आनंद शोधायचो, पण खर सांगायचं झाल तर आजच्या वेळी मला कळल कि आयुष्याचा खरा आनंद हा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यातचं आहे..✍




Comments