आपलीच नजर....
आपलीच नजर आपल्याशी खेळ खेळत असते, समोर असुनही समोर नसल्या सारखी वागत असते. मग प्रश्न पडतो हा नजरेचा खेळ आहे का, का भर्कटलेल्या मनाचा? नजरेला समोर दिसत आहे. पण मन मात्र शोध घेत आहे. कोण खर, कोण खोट ते मग दोघे भांडत आहे. या दोघांच्या भांडणात मात्र आपणच फसतो आहे. म्हणुन नजरेला दिसणाऱ्या आणि मनाला वाटणाऱ्या गोष्टींना जास्त महत्व नका देऊ कारण या दोघात आपणच अडकत असतो !......